पुणे

पाण्याचा साठा करण्यासाठी तळमजल्यावर टाकीची व्यवस्था करा

Laxman Dhenge

महापालिकेचे नागरिकांना आवाहन

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या वतीने दररोज पूर्ण दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. ते पाणी तळमजल्यावरील टाकीत जमा करून मोटार पंप लावून वरच्या टाकीत भरावे. तेथून त्याचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी केले आहे. इमारतीच्या मजल्यावर पाणीपुरवठा करण्याची महापालिकेची जबाबदारी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
वरच्या मजल्यावरील टाकीत पाणी चढत नसल्याने सदनिकेत पाणी येत नाही, असे शहरातील काही हाऊसिंग सोसायट्यांची तक्रार आहे. त्यासंदर्भात महापालिकेने वरील आवाहन केले आहे. महापालिकेच्या वतीने संपूर्ण शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा पुरेसा दाबाने केला जाते. त्यामुळे तळमजल्यावरील टाकीपर्यंत पूर्ण दाबाने पाणी पोहचते. त्या टाकीतून पाणी वरच्या मजल्यावरील टाकीत नेण्यासाठी मोटार पंपचा वापर करावा. तेथून पाण्याचा वापर केला जावा.

नळजोडास मोटार पंप लावल्यास होणार कारवाई

ज्यांच्याकडे तळमजल्यावर व वरच्या मजल्यावर टाकी नाही, त्यांनी तशी व्यवस्था करून घ्यावी. तळमजल्यावर पाणी साठवून ते वरच्या मजल्यावर न्यावे. इमारतीच्या कोणत्याही मजल्यावर पाणीपुरवठा करणे ही महापालिकेची जबाबदारी नाही. मात्र, तळमजल्यावर नळजोडास मोटार पंप लावून पाणी खेचल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहेत. तसेच, मोटार पंप जप्त केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

SCROLL FOR NEXT