पुणे

शिक्षक भरती : अभियोग्यता चाचणीचा मुहूर्त अखेर ठरला

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी ऑनलाईनच घेण्यात येणार आहे. त्यासाठी टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएल यापैकी एका संस्थेची निवड होणार आहे. निवड झालेल्या संस्थेकडून 16 डिसेंबरला परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. तर, प्रत्यक्ष परीक्षा 17 ते 28 फेब्रुवारीदरम्यान घेण्यात येणार आहे. परीक्षेचा निकाल 5 मार्च 2023 ला जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे अभियोग्यता चाचणीचा मुहूर्त ठरला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीचे आयोजन करण्यापूर्वी परीक्षेच्या निकषांमध्ये काही आवश्यक सुधारणा करून शासन निर्णय जाहीर करण्यासाठी 15 ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे. टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएल हे परीक्षा कसे घेणार, याचे सादरीकरण यापूर्वीच झाले आहे. परीक्षा परिषदेकडून निवडलेल्या संस्थेचा मान्यता प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला 17 ऑक्टोबरपर्यंत मान्यता देण्यात येईल. निवडलेल्या संस्थेला परीक्षेची तयारीकरिता 4 महिने वेळ लागेल. त्यामुळे 17 फेब—ुवारी 2023 पासून परीक्षेला सुरुवात होईल.

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, अनुदानास पात्र ठरलेल्या आणि पात्र घोषित झालेल्या शाळांमधील शिक्षण सेवकांची भरती अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय 2017 साली घेण्यात आला आहे. त्यासाठी पवित्र पोर्टल तयार करण्यात आले आहे. त्याच वेळी सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु, डिसेंबर 2017 नंतर राज्यात पुन्हा कधीही संबंधित परीक्षा घेण्यात आलेली नाही. संबंधित परीक्षा ऑनलाईन घेण्याची कोणतीही यंत्रणा राज्य परीक्षा परिषदेकडे नाही. परंतु, शिक्षण विभागाशी संबंधित बाबींबाबत मार्गदर्शन, तसेच केंद्रस्तरावरील निरीक्षण या बाबी परीक्षा परिषदेच्या स्तरावरून करण्यात आल्या होत्या. त्याचपध्दतीने फेब—ुवारी महिन्यात घेण्यात येणारी परीक्षा पार पडणार आहे.

अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. परीक्षेसाठी कंपनी नियुक्त करण्याची प्रक्रिया शासन निर्देशानुसार पार पडेल. त्यानंतर लवकरच परीक्षेेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
                         – शरद गोसावी, प्रभारी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT