पुणे

पुणे : सरकारी सेवेत दाखल झालेल्यांना नियुक्ती पत्र

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान कर्मयोगी योजनेअंतर्गत ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण करून भारत सरकारमध्ये नियुक्त झालेल्या 71 हजार नव नियुक्त युवकांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते शुक्रवारी पुण्यात हे वितरण करण्यात आले. पुण्यातील विमाननगर परिसरात असलेल्या सिंम्बायोसीस विद्यापीठात आयकर विभागाच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात राणे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले.

2023 चा पहिला रोजगार मेळावा आहे. त्या 71 हजार कुटुंबांना आनंद देणारा प्रसंग आहे. हे आयोजन अन्य कुटुंबियातील आनंद देणारा प्रसंग आहे. देशातील सर्व राज्यात असे उपक्रम राबविले जात आहे. लवकरच मध्य प्रदेश, बिहार, उत्तराखंड व महाराष्ट्रात रोजगार मेळावे होणार आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले, व्यवसाय करताना ग्राहकाला महत्त्व देऊन त्याला मोठे मानतात.

तसेच सरकारी सेवेत दाखल झालेल्या तरुणांनी ग्राहक नेहमी राईट, तसेच नागरिक हे नेहमी राईट असे मानून सेवा करावी. ऑनलाईन कोर्सेसमधून रोजगार मिळवणे आजच्या पिढीला मिळालेली संधी आहे. तुम्ही विकसित व्हा तसेच देशाचाही विकास करण्याचे ध्येय बाळगा असेही आवाहन त्यांनी केले. आयकर विभागाचे संग्राम गायकवाड यांनी आभार मानले.

  • सुप्रभा बिश्वास या मुलीला पंजाब नॅशनल बँकेत मिळालेला जॉब आणि कौटुंबिक पार्श्वभूमी बद्दल माहिती घेत तिला बोलते केले.

इतर युवकांची तयारी सुरू…
काश्मीर, श्रीनगर येथील तरुणास बोलवून तेथील परिस्थितीची माहिती घेतली. माझ्या निवडीनंतर इतर युवकांनी रोजगार मिळवण्यासाठी तयारी सुरू केली आहे, अशी माहिती त्याने दिली.

काही तरी करून दाखवण्याची इच्छा…
मणिपूर येथील तरुणीस नर्सिंग विभागात रोजगार मिळाला. मी माझ्या कुटुंबात सरकारी नोकरी मिळवणारी पहिली तरुणी असून, यापुढे माझ्या राज्यासाठी काहीतरी करून दाखवण्याची माझी इच्छा आहे असे तिने सांगितले.

पंतप्रधानांनी केले कौतुक…
दरभंगातील दिव्यांग राजूकुमारला रेल्वेत ज्युनिअर इंजिनिअर म्हणून नोकरी मिळाली. लग्न करून स्ट्रेस कमी होईल. लग्नाचा अनुभव घेण्याचा आनंद जीवनात बदल आणतो, असे म्हणताच मोदी यांनी त्याच्या इच्छाशक्तीचे कौतुक करून अभिनंदन केले.

आई – वडिलांच्या कष्टाचे कोतुक…
तेलंगणा येथील वानसी या तरुणाने कोल इंडियामध्ये ट्रेनी म्हणून जॉब मिळाला. कुटुंबाची आर्थिक स्थिती योग्य नसताना आई वडिलांनी मोठ्या कष्टाने शिकवले त्याचे मी अभिनंदन करतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT