आंध्र प्रदेशातील आंत्रेवेदी येथे पुरात अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी तटरक्षक दलाची मदत घेण्यात येत आहे. -
पुणे

New Cyclone Threat | ‘अर्णब’पाठोपाठ आणखी एका चक्रीवादळाचा धोका

पुढारी वृत्तसेवा

पुणे : आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकलेल्या ‘अर्णब’ चक्रीवादळाची तीव्रता कमी होत असतानाच बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची स्थिती आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात आणखी एका चक्रीवादळाची निर्मिती होणार का? याकडे हवामान अभ्यासकांचे लक्ष लागले आहे.

दक्षिण अंदमान समुद्रात नवीन प्रणाली

अंदमान समुद्र आणि त्याच्या आसपासच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्यासाठी पोषक स्थिती निर्माण होत आहे. या प्रणालीची तीव्रता वाढल्यास पुढील काही दिवसांत तिचे रूपांतर ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात किंवा कमी दाबाच्या अधिक विकसित प्रणालीत होऊ शकते.

महाराष्ट्रावर परिणाम होणार का?

नवीन प्रणालीची दिशा, तीव्रता आणि पुढील प्रवास यावर महाराष्ट्रातील संभाव्य परिणाम अवलंबून असतील. सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस किंवा वादळी वाऱ्यांची शक्यता निश्चितपणे सांगता येत नाही. पुढील चार ते पाच दिवसांतील हवामान विभागाचे अंदाज महत्त्वाचे ठरणार आहेत, असेही मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

ओडिशात ३०० गावे पाण्याखाली

अर्णब चक्रीवादळामुळे ओडिशातील गंजम जिल्ह्यात सुमारे तीनशे गावे पाण्याखाली गेली असून, तेथे बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. अजूनही या परिसरात पाऊस सुरूच आहे. त्याचबरोबर या वादळाचा मोठा फटका आंध्र प्रदेशला बसला आहे. ओडीशा आणि आंध्र प्रदेशात महापूर आल्यासारखी स्थिती आहे. त्या ठिकाणी एसडीआरएफ पथकांच्या माध्यमातून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. प्रचंड मोठी वित्तहानी झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT