व्याख्यानमालेत बोलताना अंजली दमानिया 
पुणे

Anjali Damania | सर्वच राजकीय पक्ष भ्रष्ट, दूरदृष्टी असलेला नेता दाखवा? : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा घणाघात

मुख्यमंत्री फडणवीसांबद्दल आदर कारण त्यांनी निदान चारित्र तरी जपले, सहजीवन व्याख्यानमालेच्या रौप्यमहोत्सवी वर्षातील पहिले पुष्प

पुढारी वृत्तसेवा

पुणेः "आपल्या देशातील अन राज्यातील सर्वंच राजकीय पक्ष भ्रष्ट आहेत. राज्यात दूरदृष्टी असणारा एक नेता मला दाखवा ? सामान्य माणून जन्मल्या पासून मरेपर्यंत फक्त कर भरतो,पण शेवटी पैसाच शिल्लक राहत नाही. तुम्ही पेटून उठला नाही तर देश पुढे जाणार नाही !". असे घणाघाती व्यक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुण्यात केले.

सहकारनगर परिसरातील सहजीवन व्याख्यानमालेच्या रौप्यमहोत्सवी वर्षीतील पहिले पुष्प अंजली दमानिया यांनी सोमवारी सायंकाळी गोवले. सुमारे दिड तास त्यांनी महाराष्ट्रासह ,देशाचे भ्रष्ट राजकारण, भाजप, कॉंग्रेस,दोन्ही शिवसेना,दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस,आम आदमी पार्टी यांच्या विरोधात कसे लढले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री छगन भूजबळ यांचे किस्से सांगत त्यांनी श्रोत्यांना राज्यातील नेत्यांचे कादगावर दाखवलेले अल्प उत्पन्न दाखवले. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनवर आकडे दाखवत त्यांनी देश अन महाराष्ट्राची अधोगतीकडे कशी वाटचाल सुरु आहे हे दाखवले.

सर्वच राजकीय पक्ष भ्रष्ट

पुढे त्‍या म्हणाल्या माझे बाबा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते.म्हाडा मध्ये नोकरीला होते.मी अकरा वर्षाची असताना त्यांची नोकरी गेली.त्या खात्यात भ्रष्टाचार झाल्याने वडीलांना राजीनामा दिला.ते बाळकडू माझ्यात आले. मी साधी गृहीणी होते. माझी कोकणातील जमीन सरकार जमा झाल्याने मी लढा दिला. तेथून समाजकारणात आले पुढे आम आदमी पक्षात गेले ,कारण त्यांचा जाहिरनामा,कामाची पध्दत आवडली पण तेथेही इतर राजकीय पक्षांसारखे सुरु झाले.अरविंद केजरीवाल यांच्या इगो मुळे तो पक्ष सोडला. -मी कोणत्याही पक्षाच्या बाजूने नाही, कारण सर्वंच राजकीय पक्ष भ्रष्ट आहेत असे माझे मत आहे.

सध्या माझ्यावर आरोप होत आहेत की मी भाजपचे काम करते ते सांगतात तेच करते.पण हे आरोप चुकीचे आहे.मी कुणाचीच नाही.कारण मी सर्वंच पक्षांच्या भ्रष्टाचारावर बोलते.सर्वाच्या विरोधात लढते आहे. राज्यातील एकाही नेत्याला दूरदष्टी नाही.असेल तर मला नाव सांगा ?भाजप मध्ये बाहेरच्या पक्षातूनच जास्त लोक आले त्यामुळे मूळ लोक बाजूला राहिले. सर्वंच राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांचा कडीपत्त्याप्रमाणे वापर सुरु आहे.काम झाले की फेकुन देतात.

पालकमंत्रीपद हे भ्रष्टाचाराचे मोठे कुरण

मंत्री छगन भुजबळ यांच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याची फाईल बंद का केली ? त्याचे कारण सांगितले जात नाही.मी पार्टी इन पर्संन कोर्टात उभे राहून लढले पण शेवटी निराशाच हाती आली.सर्व करुन सवरुन भुजबळ शेवटी सुटलेच.ती फाईल बंद केली. -राज्यातील पालकमंत्रीपद हे भ्रष्टाचाराचे मोठे कुरण आहे.ते रद्द केले पाहिजे. मंत्र्यांच्या सोयीसाठी फक्त महाराष्ट्रात हे पद निर्माण केले आहे. पंतप्रधान मोदी सांगतात विदेशात फिरु नका चैन करु नका मग स्वतः विदेशात का गेले.युएई वगळता एकही दौरा कामाचा नाही. अशीही टीका त्‍यांनी केली.

पुढे त्‍या म्हणाल्या मुख्यमंत्री फडणवीस एकच दिवस बुलेटवरुन फिरले.दुसऱ्या दिवसांपासून परत सर्वकाही सुरळीत. सामान्य माणूसाने सरकारला जाब विचारला पाहिजे तरच देशाची प्रगती होईल अन्यथा आपली आता दर दिवशी अधोगती होत आहे. चीनचा मला खूप राग येत असे पण तो देश पाहिल्यावर समजले की,ते आपल्यापेक्षा गुपचुप खूप पुढे निघून गेले आहेत.ट्रम्पला देखील त्यांनी झुकवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT