पुणे; पुढारी वृत्तसेवा : मानधनाच्या प्रश्नासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस सोमवारपासून (दि. 20) संप करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडून देण्यात आली. राज्यात सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे सरकारने अंगणवाडीताईंचे प्रश्न प्राधान्याने सोडवू, असे आश्वासन देऊन प्रजासत्ताक दिनाची तारीखही जाहीर केली होती. मात्र, तसे झाले नाही, असे कृती समितीचे म्हणणे आहे.