पुणे

येरवडा : …अन् बालसुधारगृहात तयार झाली मुलांची फुटबॉल टीम

अमृता चौगुले

उदय पोवार :

येरवडा : बालवयात हातून गुन्हा घडल्यानंतर वयात आल्यानंतर पुन्हा गुन्हेगारीकडे पावले वळतात. बाल निरीक्षण ( सुधार) गृहात असताना तेथून बाहेर पडल्यानंतर आपण हप्ता वसुली करायची, याला मारायचे, असे प्लॅन शिजत असतात. मात्र, येरवड्यातील बालसुधारगृहातील मुलांच्या मनातील गुन्हेगारीचा विषय कायमचा बाहेर काढून त्यांना फुटबॉल खेळाकडे वळविण्यात आले आहे.

बालसुधारगृहातील 9 पैकी 3 मुलांची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नऊ मुलांना फुटबॉलविषयी प्रेम निर्माण झाले आहे.
अधीक्षका पूजा कणसे, बाल न्याय मंडळ पीठासन अधिकारी मानसी परदेशी, आम्रपाली शिरसाट, योगिता पाटील, संदेश बोर्डे, अमोल कर्डक, कुणाल राजपूत यांचे या मुलांना मार्गदर्शन लाभले. येरवडा येथील पंडित जवाहरलाल नेहरू बालसुधारगृहातील शिक्षकांना गुन्हेगारीकडे वळणार्‍या मुलांना खेळाकडे वळविण्यात यश आले आहे.

याविषयी माहिती देताना संदेश बोर्डे म्हणाले, की नऊपैकी सहा जण हे गंभीर गुन्ह्यामुळे निरीक्षणगृहात आहेत. या मुलांना खेळासाठी बाहेर नेल्यास ती पळून जातील, याची भीती वाटत होती. मुलांना नागपूर येथे घेऊन जाण्यासाठी विशेष बाल न्याय मंडळाची परवानगी घेतली होती. 9 पैकी 3 मुलांची नॅशनल लीडरशिप प्रोग्रमअंतर्गत निवड झाली. आता ती मुले निरीक्षणगृहातील इतर मुलांना प्रशिक्षण देणार आहेत. तसेच प्रत्येक ठिकाणाच्या निरीक्षण गृहात जाऊन प्रशिक्षण देणार असून, ब्रँड अ‍ॅबेसेडर म्हणून राहणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT