पुणे : यावर्षी मंगळवारी अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2024) आहे. हा गणेश चतुर्थी म्हणजेच श्री गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेपासूनचा अकरावा दिवस असून या दिवशी मंगळवार म्हणजे श्री गणेशाचा वार असला तरीही परंपरेप्रमाणे विसर्जन करावे. या दिवशी चतुर्दशी तिथी दुपारी पावणेबारा वाजताच संपत असली तरीही त्यानंतरही श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करता येईल, अशी माहिती दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली. पुढच्या वर्षी गणपती बाप्पांचे आगमन लवकर म्हणजे २७ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे.
मंगळवारी अनंत चतुर्दशीला (Anant Chaturdashi 2024) बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. अनंत चतुर्दशीला गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना केलेल्या श्री गणेशमूर्तीचे विसर्जन होणे आवश्यक आहे आणि ते पाण्यामध्ये करावे, असे धर्मशास्त्र सांगते. वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे, असे नसून पाण्यात विसर्जन करावे, असे आहे. त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र टैंटँकमध्ये, घरी मोठ्या बादलीमधील पाण्यातसुद्धा विसर्जन करता येते. विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक आहे, असेही दाते यांनी सांगितले.