केडगाव; वृत्तसेवा : ऊस घेऊन चाललेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला अॅम्ब्युलन्सने जोरदार धडक दिली. चौफुला (ता. दोंड) येथे बुधवारी (दि.4) सायंकाळी साडेचारच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातात अॅम्ब्युलन्सचालक किरकोळ जखमी झाला असून, अॅम्ब्युलन्सचे मोठ्या प्रमाणात, तर ऊस ट्रॉलीचे किरकोळ नुकसान झाले आहे.
सोलापूर बाजूने दोन ट्रॉली ऊस असलेला ट्रॅक्टर पुण्याच्या दिशेला जात असताना सोलापूरकडून निघालेली भरधाव अॅम्ब्युलन्स (क्र. एम एच 04 एफ जे 5039) हिने चौफुला येथे ट्रॉलीला मागून जोरदार धडक दिली. अपघातात जखमी अॅम्ब्युलन्स चालकाला चौफुला येथील खासगी रुग्णालयात नेले आहे.