पुणे

अमिताभ गुप्ता यांची पुन्हा पुण्यात बदली

अमृता चौगुले

पुणे : पुण्यातील कारागृह व सुधारसेवाच्या अपर पोलिस महासंचालकपदी अमिताभ गुप्ता यांची बदली करण्यात आली आहे. तसेच, मुंबईतील विशेष शाखेचे अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांची पुणे शहर अपर पोलिस आयुक्त (पूर्व) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची दोन दिवसांपूर्वी अपर पोलिस महासंचालक कायदा व सुव्यवस्था मुंबई येथे बदली करण्यात आली होती. ती बदली रद्द करून त्यांची पुन्हा पुण्यात बदली करण्यात आली आहे, तर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांची पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात पोलिस सहआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT