Amit Thackeray Pudhari
पुणे

Amit Thackeray: अमित ठाकरे यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, मोदींचा फोटो काढल्याप्रकरणी तक्रार

Amit Thackeray Pune: प्राचार्यांनी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती त्यावरून गुन्हा दाखल.

पुढारी डिजिटल टीम

Amit thackeray Pune Polytechnic Protest News

पुणे : पुण्यातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजमधील आंदोलनाप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरेंविरोधात सोमवारी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. कार्यालयात विनापरवानगी प्रवेश आणि प्राचार्यांना धमकी दिल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह 25 जणांविरोधात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आली आहे.

सोमवारी अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. शिवाजीनगर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते गेले होते. हॉस्टेलमधील अस्वच्छता तसेच कॅन्टीनमधील खराब जेवण याच्याबाबत विद्यार्थ्यांनी अमित ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. यानंतर कॅन्टीनच्या पाहणीदरम्यान अमित ठाकरेंना सडलेले कांदे दिसले. हेच कांदे घेऊन अमित ठाकरे आणि मनविसेचे इतर कार्यकर्ते कार्यकर्ते प्राचार्यांच्या केबिनमध्ये घुसले होते.

मोदींचा फोटो काढायला लावला

महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या कक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोच्या बाजूला मोदींचा फोटो होता. हा फोटो अमित ठाकरेंनी काढायला लावला. यावरुन राज्याच्या राजकारणात ठिणगी पडली आहे.

प्राचार्यांनी दिली तक्रार

अमित ठाकरेंसह मनविसेच्या 25 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राचार्य डॉ. राजेंद्र काशिराम पाटील यांनी जबाबात म्हटले आहे की, 'अमित ठाकरे पूर्वपरवानगीविना महाविद्यालयात आले. मेस आणि स्वच्छतागृहाची अवस्था याबाबत जाब विचारला. तसेच आमच्या कार्यालयात घुसून मोदींचा फोटो काढायला लावला. यास विरोध दर्शवला असता उद्धटपणे वागणूक करत घोषणाबाजी केली. तसेच आठ दिवसांत मागण्यांची पूर्तता केली नाही तर पुन्हा आंदोलन करू' अशी धमकी दिली.

कोणत्या कलमांखाली गुन्हा?

भारतीय न्याय संहितेमधील कलम 329, 189, 46, 221, 351 अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT