Cultural Memorial Protest Pudhari
पुणे

Cultural Memorial Protest: आंबेडकर सांस्कृतिक स्मारक विस्तारासाठी जनआक्रोश आंदोलनाला विविध पक्षांचा पाठींबा!

सरकारने आरक्षित जागेचे हस्तांतरण त्वरीत करावे; मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलन सुरू ठेवणार समिती

पुढारी वृत्तसेवा

येरवडा: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समितीच्या वतीने मंगळवार पेठ, मालधक्का चौक आरक्षीत जागा सांस्कृतिक स्मारक विस्तारासाठी राज्य सरकारने त्वरीत हस्तांतरण करावी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि एनजी व्हेंचर या खाजगी बांधकाम व्यवसायिकामध्ये बेकायदेशीर झालेला भाडेकरार रद्द व्हावा. (Latest Pune News)

या मागणीसाठी समितीला रिपब्लिकन जनशक्ती, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) भिम आर्मी बहुजन एकता मिशन, सेव बुध्दा केव अॅण्ड हेरिटेज, बुध्द लेणी संवर्धन समिती, बहुजन सुरक्षा दल, भिम शक्ती, राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट), शिवसेना (उबाठा), आदिवासी पारधी समाज संघटना, मुस्लिम संघटना, ६५ बुध्द विहाराचे प्रतिनिधी, २२ भिम जयंती मंडळे इत्यादीं पक्ष संघटनांनी पाठिंबा दिलेला असून, हे सर्वजन प्रमुख प्रतिनिधी समितीच्या वतीने गुरुवार (ता ३० ) रोजी वेळ सकाळी ११.३० वाजता स्थळः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा उद्यान, पुणे स्टेशन येथे बेमुदत जनआक्रोश आंदोलन संविधानवादी लोकशाहीवादी नागरिकांच्या वतीने होत असलेल्या आंदोलनात वरील मागणीसाठी सहभाग घेवून राज्य सरकारकडे मागणी करणार आहेत.

तसेच राज्य सरकारने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक विस्तारीकरण भवन विस्तारिकरणाची जागा खाजगी बांधकाम व्यवसायिकाला दिली असल्यामुळे राज्य सरकारचा तीव्र निषेध करणार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे समितीचे समन्वयक शैलेंद्र मोरे, दिपक गायकवाड, राजाभाऊ कांबळे, निताताई अडसुळे, रविंद्र कांबळे, फिरोज मुल्ला यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT