Three-day trial on Amalner Beed rail route
पुणे: अमळनेर-बीड रेल्वे विभागातील नव्या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गाचे मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी म्हणजे बुधवारी (दि. 17) उद्घाटन होणार आहे.
तत्पूर्वी, रेल्वे प्रशासनाकडून डेमू (डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) द्वारे दि. 14, 15 आणि 16 सप्टेंबर 2025 रोजी या विभागात ट्रायल रन घेण्यात येणार आहे. ही ट्रायल रन नियमित प्रवासी सेवा सुरू करण्यापूर्वी ट्रॅकची अखंडता, सिग्नल सिस्टिम आणि एकूण सुरक्षा मानके पडताळण्यास मदत करणार आहे. (Latest Pune News)
त्यामुळे या मार्गावर कुठेही ट्रॅकजवळ बसू नका, पाळीव प्राण्यांना ट्रॅकजवळ जाण्यापासून रोखा, रेल्वे मालमत्तेवर किंवा ट्रॅकवर अतिक्रमण करू नका, अधिकृत लेव्हल क्रॉसिंग किंवा ओव्हरबिज वगळता रुळांवरून चालणे किंवा ओलांडणे टाळा, लहान मुलांना रेल्वेरुळांपासून दूर ठेवा, असे आवाहन रेल्वेच्या पुणे विभागाकडून करण्यात आले आहे.