पुणे शहरात रविवारी पावसाने दाणादाण उडवून दिली Pudhari
पुणे

Pune : पुण्यात ढगफुटी; जिल्ह्यात विश्रांती

पुढारी वृत्तसेवा

पुणे शहरात रविवारी पावसाने दाणादाण उडवून दिली. शहरातील वडगाव शेरी भागात एका तासात 111 मिलिमीटर पाऊस झाल्याने तेथे अतिवृष्टी झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. पावसाचा जोर एवढा होता, की शहरातील बहुतांश भागांतील घरांत, दुकानांत पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि संपूर्ण जिल्ह्यात शनिवारी चांगला पाऊस झाला. मात्र, रविवारी जिल्ह्यातील पाऊस थांबला. शहरात सायंकाळी 5 ते 6 या एका तासात पावसाने शहराला झोडपून काढले. त्यामुळे शहरातील रस्त्यांना पूर आला होता.

वडगाव शेरी, कोरेगाव पार्क, शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवड, सांगवी या भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली. सायंकाळी 6.30 वाजता मात्र पाऊस थांबला. त्यामुळे दिवसभर सुरू असलेला उकाडा एकदम कमी झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT