Who is IAS Pooja Khedkar
पुण्यातील प्रोबेशनर IAS अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिमला बदल झाली आहे 
पुणे

IAS Pooja Khedkar | पूजा खेडकर कोण आहेत? त्यांची बदली का झाली?

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्यात नियुक्ती असलेल्या प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यात बदली झालेली आहे. प्रोबेशनरी अधिकाऱ्यांना लागू होत नसलेल्या सुविधा मागितल्यामुळे त्या चर्चेत आल्या होता.

पूजा खेडकर यांची बदली का झाली?

डॉ. पूजा खेडकर यांची बदली वाशिम जिल्ह्यात करण्यात आलेली आहे. राज्य सरकारला त्यांच्याबद्दल तक्रारी मिळाल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. राज्य सरकारचे सहायक सचिव एस. एम. महाडिक यांनी त्यांच्या बदलीचे आदेश पारित केले आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी शासनाला अहवाल सादर केल्यानंतर ही कारवाई झाली आहे.

पूजा खेडकर यांनी काय मागण्या केल्या होत्या?

प्रोबेशनवरील अधिकाऱ्यांना मिळत नसलेल्या सुविधा आणि सवलती मागितल्यामुळे त्या वादग्रस्त ठरल्या होत्या. स्वतःच्या वाहनावर लाल रंगाचा दिवा हवा, लेटरपॅड, नेमप्लेट, स्वतंत्र ऑफिस, स्टाफ अशा मागण्या त्यांनी केल्या होत्या. त्यांच्या या मागण्यामुळे प्रशासकीय वर्तुळात त्या चर्चेत होत्या, असे टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. शिवाय त्यांनी त्यांच्या खासगी ऑडी कारला लाल दिवा लावला होता, आणि हे फोटो व्हायरल झाले होते.

पूजा खेडकर यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे यांची अँटी चेंबर रूम स्वतःची केबिन म्हणून वापरण्यास सुरुवात केली होती, असेही या बातमीत म्हटले आहे. त्यांनी त्यांच्या खासगी ऑडी कारवर लाल दिवा लावला होता, असे लाईव्ह मिंटच्या बातमीत म्हटले आहे.

पूजा खेडकर कोण आहेत? | IAS Pooja Khedkar

पूजाचे वडील दिलीप खेडकर महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातील निवृत्त अधिकारी आहेत. तसेच पूजाचे आजोबा जगन्नाथराव बुधवंत प्रशासनात वरिष्ठ अधिकारी होते. तर त्यांच्या आई भालगाव, पाथर्डी तालुक्याच्या सरपंच आहेत.

पूजा खेडकर या २०२३ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत त्यांचा रँक ८२१ (PWD-D) असा आहे, असे लाईव्ह मिंटच्या बातमीत म्हटले आहे. पूजा यांना सुरुवातीला नेमणूक नाकारण्यात आली होती. २०२३ला त्यांनी Rights of Persons with Disabilities Act, 2016 कायद्यानुसार प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर त्यांना नेमणूक देण्यात आली.

SCROLL FOR NEXT