पुणे

वल्लभनगर आगारात चालकांची मद्यपान चाचणी

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने करण्यात आलेल्या आवाहनानुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर आगारात गुरूवार दि. 31ऑगस्ट, 2 आणि दि. 3 सप्टेंबर रोजी एकूण 618 चालकांची मद्यपान चाचणी घेण्यात आली. यापैकी एकही चालक चाचणीमध्ये दोषी आढळला नसल्याची माहिती आगार व्यवस्थापकांनी दिली. मद्यपान करून, वाहन चालविणे कायद्याने गुन्हा आहे. चालकांवर बसमधील प्रवाशांच्या जबाबदारी असते. मद्यपान करून वाहन चालविणे हे स्वतःसह इतरांच्या जिवितास धोका निर्माण करणारे आहे. यामुळे अपघात होऊन मोठी दुघर्टना घडू शकते.

म्हणून महामार्गावरील मध्यम, लांब पल्ल्याच्या आणि रात्रीच्या प्रवास करणार्या सर्व बसवरील चालकांची मद्यापान तपासणी मोहीम एकाच वेळी महामंडळाच्या वतीने राबविण्यात आली. याबाबत कुठल्याच चालकांना पूर्व माहिती मिळणार नाही याची खबरदारी आगारातून घेण्यात आली होती, असे आगार प्रमुख संजय वाळवे यांनी सांगितले.

अशी राबविली मोहीम
चालकांच्या मद्यपान तपासणी मोहिमेत आगार प्रमुख, वाहतूक निरिक्षक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक आणि लिपिक आदी कर्मचार्‍यांचा समावेश होता. गुरुवार दि. 31 रोजी रात्री 12 नंतर आगारात येणार्‍या बसमधील चालकांच्या शारीरिक लक्षणांची तपासणी आणि मशिनद्वारे मद्यपान तपासणी तपासणी करण्यात आली. यानंतर दि. 2 आणि 3 रोजीही तपासणी झाली.फ

दोषी आढळल्यास कारवाई
मद्यपान तपासणी मोहीम सतत घेतली जाणार आहे. यामध्ये दोषी आढळल्यास त्या चालकांची संपूर्ण माहिती वरिष्ठ कार्यालयाला कळविली जाणार आहे. त्यानुसार चालकांवर फौजदारी कारवाई केली जाणार असल्याची माहिती आगार प्रमुखांनी दिली.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT