पुणे

दै. ‘पुढारी’ आयोजित ‘राईज अप’ महिला बुद्धिबळ स्पर्धा : आकांक्षा हगवणे, दिशा पाटीलला विजेतेपद

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दै. 'पुढारी' आयोजित 'राईज अप' महिलांच्या बुद्धिबळ स्पर्धेत 20 वर्षांखालील गटात दिशा पाटील हिने तर महिलांच्या गटात सोळा वर्षांखालील गटातील महिला ग्रँडमास्टर आकांक्षा हगवणे हिने विजेतेपद पटकाविले. दै.'पुढारी' आयोजित या स्पर्धा फडके हॉल, सदाशिव पेठ येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये 20 वर्षांखालील महिलांच्या गटामध्ये दिशा पाटील हिने प्रथम क्रमांक पटकाविला. आदिती वावळ हिने व्दितीय क्रमांक तर राजेश्वरी देशमुख हिने तृतीय क्रमांक पटकाविला.

साई पाटील हिने चौथा क्रमांक तर इशा कोळी हिने पाचवा क्रमांक मिळविला. याव्यतिरिक्त श्रावणी हळकुंडे, पल्लवी यादव, मानसी ठाणेकर, समिक्षा मांदळे, वेदांती इंगळे, उत्कर्षा मांदळे, प्राची शिरुडे, ईश्वरी जगदाळे, मोक्षदा शेठ आणि दिपा कुमार यांनी अनुक्रमे सहा ते पंधरा क्रमांक पटकाविले. खुल्या गटामध्ये आकांक्षा हगवणे हिने धनश्री खैरमोडे हिचा सात फेर्‍यांमध्ये पराभव करीत विजेतेपद पटकाविले.

धनश्री खैरमोडे हिला व्दितीय स्थानावर तर दिव्या पाटील हिला तिसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले. अनुक्षा कुतवळ हिने चौथा क्रमांक तर अंकिता गुप्ताने पाचवा क्रमांक पटकाविला. या वयोगटात मोक्षदा महाजन, संस्कृती मोरे, गीता कुलकर्णी, समृध्दी जोशी, युती पटेल, मृण्मयी भार्गवी, आदिती खेडकर, अर्चिता तोरसकर, मेघना दातार आणि किर्ती वळसण यांनी अनुक्रमे 6 ते 15 क्रमांक पटकाविले.

25 वर्षांवरील वयोगटामध्ये श्रीहा वोयापती यांनी प्रथम क्रमांक, भैरवी देशमाने हिने व्दितीय क्रमांक तर आशा ठोंबरे हिने तृतीय क्रमांक पटकाविला. 56 वर्षांवरील वयोगटामध्ये ज्योत्सना हापसे यांनी प्रथम क्रमांक, तेजश्री खापडेकर यांनी व्दितीय तर मेघना जोशी यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. 15 वर्षांखालील गटामध्ये श्रावणी उंदाले हिने प्रथम क्रमांक, आदिती कायाल हिने व्दितीय क्रमांक, सिध्दी धाडवे हिने तृतीय क्रमांक, प्रिती खंडेलवालने चौथा क्रमांक तर मानवी टिळेकर हिने पाचवा क्रमांक पटकाविला.

10 वर्षांखालील गटामध्ये ओवी पावडे हिने इरा बोहरा हिचा सात फेर्‍यांमध्ये पराभव करीत विजेतेपद पटकाविले. इराला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या सामन्यात चतुर्थी परदेशीने तिसरा क्रमांक, तन्मयी घाटेने चौथा तर अनन्या भगत हिने पाचवा क्रमांक पटकाविला. या गटामध्ये सिध्दी बुबाणे, साजिरी देशमुख, इशिका दवरे, केशवी राधाकृष्णन, अनिका खंडेलवाल, अनुजा कोळी, सानवी गोरे, स्पृहा कमलापुरे, पालस तापळे आणि प्रियांका कुलकर्णी यांनी अनुक्रमे 6 ते 15 क्रमांक मिळविले. 7 वर्षांखालील गटामध्ये झालेल्या सामन्यांमध्ये अन्वेषा सोनी हिने प्रथम क्रमांक, साची चौधरीने व्दितीय क्रमांक, भाग्यता सालकरने तृतीय क्रमांक, चास्कर शाळवे हिने चौथा तर स्पृहा कसबे हिने पाचवा क्रमांक पटकाविला.

SCROLL FOR NEXT