Ajit Pawar  pudhari photo
पुणे

Ajit Pawar : सापडला की टायरीमध्येच टाकतो; अजित पवारांचा 'बारामती'करांना इशारा

Anirudha Sankpal

Ajit Pawar Warns People of Baramati :

बारामती मतदारसंघातील एका कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना एक अत्यंत कठोर आणि थेट इशारा दिला आहे. भिंतींवर आणि फूटपाथवर 'हार्ट' (हृदयाचे चिन्ह) काढणाऱ्यांना त्यांनी 'टायरी'मध्ये टाकण्याची भाषा वापरल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले अजित पवार?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास शैलीतून बारामतीकरांना सज्जड दम दिला. "बारातमीत हार्ट काढलं आणि तो कोणी सापडला तर टायरीतच घालतो. भिंतीवर, फूटपाथवर हार्ट काढत बसू नका. मी आता कॅमेरे लावणार आहे. सापडला की टायरीमध्येच टाकतो."

इशारा कशासाठी?

अजित पवारांनी 'टायरी'मध्ये टाकण्याची भाषा वापरून, सार्वजनिक मालमत्तेवर होणाऱ्या विद्रुपीकरणाला अजिबात थारा दिला जाणार नाही, असा कठोर संदेश दिला आहे. यामागे शहरात चांगली विकासकामे झाली असून उत्तम दर्जाचं सुशोभिकरण देखील झालं आहे. या सार्वजनिक मालमत्तेचं विनाकारण आणि विकृतपणे विद्रुपीकरण होऊ नये यासाठी परावांनी हा सज्जड दम भरला आङे.

कॅमेरे लावून अशा लोकांवर नजर ठेवण्याची घोषणा करून त्यांनी बारामतीरांना तुमच्यावर माझी नजर असणार आहे असा इशाराच दिला.

अजित पवारांची बेधडक वक्तव्य

अजित पवार हे आपल्या बेधडक वक्तव्यासाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. ते कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी अन् पक्षातील नेत्यांना देखील सज्जड भाषेत दम देतात. कधी कधी हा बेदरकारपणा त्यांच्या अंगलट देखील येतो. नुकतेच सोलापूरमधील एका महिला आयपीएस अधिकाऱ्यासोबतचा अजित पवार यांच्या संभाषणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

त्यावरून अजित पवार यांच्यावर टीका देखील झाली होती. अवैध मुरूम उत्थननाविरूद्ध कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना अजित पवार यांनी दम भरला होता. मात्र त्यानंतर त्यांनी सारवासरव करत कार्यकर्त्याच्या मागणीनंतर आपण कॉल केला. प्रत्यक्ष परिस्थितीचा कल्पना नव्हती असं उत्तर दिलं होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT