Ajit Kadethankar Pudhari
पुणे

Ajit Kadethankar: झेडपी शाळेचा विद्यार्थी झाला हायकोर्टात न्यायमूर्ती; कोण आहेत अजित कडेठाणकर?

Bombay High Court: अ‍ॅड. अजित कडेठाणकर यांची मुंबई उच्चन्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली

पुढारी वृत्तसेवा

  • पैठणच्या शाळेत शिकलेल्या अ‍ॅड अजित कडेठाणकरांचा प्रवास

  • मंगळवारी मुंबई उच्चन्यायालयात होणार शपथसोहळा

  • वडील दिवंगत अ‍ॅड.भगवानराव कडेठाणकर हे जुन्या पिढीतील नामवंत वकील होते

Who is Ajit Kadethankar Bombay High Court Judge

पुणे : पैठण सारख्या छोट्याशा गावात जिल्हा परिषद शाळेत शिकलेले अ‍ॅड. अजित कडेठाणकर यांची मुंबई उच्चन्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली आहे.मुंबई उच्चन्यायालयाच्या सेंट्रल हॉल मध्ये 19 ऑगस्ट रोजी मंगळवारी सकाळी 11 वाजता त्यांचा शपथसोहळा होणार आहे. (Latest Pune Update)

सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीने राष्ट्रपतींनी ही नियुक्ती केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत असलेले पैठणचे भूमिपुत्र अ‍ॅड. कडेठाणकर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली आहे. या संदर्भातील अधिसूचना केंद्र सरकारच्या विधी व न्याय विभागातर्फे जारी करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या सेन्ट्रल हॉलमध्ये नवनियुक्त न्यायमुर्ती कडेठाणकर यांचा शपथसोहळा मंगळवारी पार पडेल. राष्ट्रपतींच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे हे शपथ देतील.

जिल्हा परिषद शाळेत शिक्षण..

अ‍ॅड. कडेठाणकर यांचा जन्म पैठण या छोट्याशा गावात झाला.त्यांचे वडील दिवंगत अ‍ॅड.भगवानराव कडेठाणकर हे जुन्या पिढीतील नामवंत वकील होते.आई प्रतिभा कडेठाणकर या संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ शिक्षिका आहेत.मोठे भाऊ डॉ. अनंत कडेठाणकर हे डॉक्टर आहेत. त्यांचे संपूर्ण शालेय मराठी माध्यमातून झाले. प्राथमिक शिक्षण केंद्रीय प्राथमिक शाळा क्र.1 आणि जि.प. हायस्कूल पैठण,तर हायस्कूल चे शिक्षण स.भू. प्रशाला,छ.संभाजीनगर येथे झाले.पुढे विधी शाखेचे शिक्षण त्यांनी येथे मा.प. विधी महाविद्यालयात घेतले.

मराठी ग्रंथवाचनाची आवड...

अ‍ॅड.कडेठणकर यांना मराठी वाचनाची आवड असून पू,ल.देशपांडे,आचार्य अत्रे हे त्यांचे आवडते लेखक आहेत.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पुस्तकाचे विपूल वाचन त्यांनी केले आहे.पत्नी रंजन कडेठाणकर या देखील विधी पदवीधर असून मुलगा अथर्व निती आयोगात शास्त्रज्ज्ञ पदावर कार्यरत आहे.मुलगी नक्षत्रा ही अमेरिकेत शिक्षण घेत आहे.स्नुषा प्रणिता या बंगरुळू येथे अ‍ॅमेझॉन मध्ये कार्यरत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT