पुणे: अघोरी विद्येचा वापर करून विवाहितेचा छळ करून तिला अघोरी पद्धतीची परीक्षा देण्यास सांगून नंतर तिला नांदविण्यास नकार दिला. याप्रकरणी सासरच्यांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अधोरी प्रथा, जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात 22 वर्षीय विवाहितेने पिंपरी-चिंचवड पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा झिरो नंबरने हडपसर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. (Latest Pune News)
फिर्यादी महिलेच्या सासरच्यांकडील लोकांनी तिचा मानसिक छळ करून तिला अघोरी प्रथा पाळण्यास जबरदस्ती केली. तिला अमावस्या, पौर्णिमेच्या रात्री घरात पूजा-अर्चा केली. तसेच आरोपींनी तिला नग्न होऊन झोपण्यास सांगितले. मात्र तिने आरोपींचे न ऐकल्याने आरोपींनी तिच्यावर लैंगिक हल्ला करून तिचा विनयभंग केला. तसेच तिला मूल झाल्यानंतर ते मूल त्यांचे नाही, म्हणत तिच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले. यानंतर तिला अघोरी परीक्षा देण्यास सांगून नंतर नांदविण्यास नकार दिला. या प्रकारानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.