निवडणुक pudhari
पुणे

पडघम विधानसभेचे : निवडणुकीसाठी प्रशासन अलर्ट मोडवर

पुढारी वृत्तसेवा

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान सर्व संबंधित बाबींसाठी निवडणूक विभागाने नेमलेल्या समन्वयक अधिकार्‍यांनी समन्वयाने काम करून निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी पुणे महापालिकेच्या निवडणूक विभागाचे उपायुक्त महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्यासह सर्व संबंधित समन्वय अधिकारी उपस्थित होते.

डॉ. दिवसे यांनी मतदान केंद्रावर किमान आश्वासित सुविधा, दिव्यांगांना उपलब्ध करून द्यावयाच्या सोयी-सुविधा, व्हीलचेअर, ज्यांना हालचाल शक्य नाही अशा दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना घरून मतदानासाठी मतदान केंद्रापर्यंत करावयाची व्यवस्था उत्तम पद्धतीने ठेवावी, अशा सूचना दिल्या. संकल्पनाधारित मतदान केंद्रांची स्थापना करण्यासाठी विशेष पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.

विविध विषयांशी संबंधित यंत्रणांचे प्रशिक्षण, मतदानासाठी नियुक्त कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण, जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाची स्थापन, विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजन, टपाली मतदान, संपर्क आराखडा, मतदारसंघांना मतदान यंत्रांचे वाटप, संशयास्पद बँक व्यवहारावर लक्ष ठेवण्याची व्यवस्था या अनुषंगाने सूचना देऊन भरारी पथके (एफएसटी) स्थापन करण्याबाबतचे आदेश तत्काळ काढावेत, असेही ते म्हणाले.

ग्रामीण भागातील मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग अर्थात स्वीप कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा. शहरात महापालिकांनी यासाठी विशेष प्रयत्न करावेत. सहकार विभागाशी समन्वयाने सहकारी गृहनिर्माण संस्थांत मतदान जागृती करावी, असे त्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT