पुणे : पुढारी वृत्तसेवा : पीएमपीकडून दि. 31 डिसेंबर 2023 आणि दि. 1 जानेवारी 2024 रोजी मौजे पेरणे फाटा (भीमा कोरेगाव) येथे जयस्तंभास मानवंदना देण्याकरिता येणार्या अनुयांयीसाठी जादा बस गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुस्ती मैदान-लोणीकंद, खंडोबा माळ-लोणीकंद, सैनिकी शाळा, फुलगाव, तुळापूर रोड, चिंचवण हॉटेल/वाय जंक्शन, तुळापूर रोड येथून, तर शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतील जीत पार्किंग,
वक्फ बोर्ड, जाधव पार्किंग, चाकण रोड, तोरणा हॉटेल, शिक्रापूर पार्किंग, वढू पार्किंग, इनामदार हॉस्पिटल या ठिकाणाहून भीमा कोरेगाव विजयस्तंभापर्यंत मोफत बससेवा पीएमपीएमएलकडून देण्यात येणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातून इतर मार्गांच्या बसने अनुयायींना पार्किंगपर्यंत तिकीट घेऊन प्रवास करावा लागणार आहे, असे पीएमपीकडून सांगण्यात आले आहे.