पुणे

Katraj Dudh Sangh : कात्रज संघाकडून आदर्श दूध संस्थांचा सन्मान

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या सभासद असलेल्या आणि उत्कृष्टपणे कामकाज करणार्‍या 16 आदर्श दूध संस्था आणि कात्रज पशुखाद्यांची सर्वाधिक विक्री करणार्‍या 3 दूध संस्थांना संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर व संचालकांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये शाल, प्रशस्तिपत्रक, सन्मान चिन्ह आणि प्रोत्साहनपर 11 हजार रुपये देऊन संस्थांना सन्मानित करण्यात आले. दूध संस्थांच्यावतीने शेतकरी, संचालक मंडळांनी सन्मान स्विकारला. संघाला स्वच्छ दूध उत्पादनास प्रोत्साहन मिळण्यासाठी आणि अधिकाधिक कात्रज पशुखाद्याची विक्री वाढविण्याच्या उद्देशाने संघाकडून दरवर्षी दूध सोसायट्यांना सन्मानित करण्यात आल्याची माहिती संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी कळविले आहे.

आदर्श दूध संस्थांची नांवे पुढीलप्रमाणे. काठापूर बु. सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित काठापुर (आंबेगांव), श्री भिमाशंकर महिला सहकारी दूध, चांभारेवस्ती-सुपे (खेड), श्री हनुमान सहकारी दूध-होगजेवाडी-औदर (खेड), श्री मल्लिकार्जुन सहकारी – न्हावरा (शिरुर), श्री नागेश्वर सहकारी- निमोणे (शिरुर), फराटे पाटील सहकारी- मांडवगण फराटा (शिरुर), जयमल्हार महिला सहकारी ः नंदादेवी-नांगरेवाडी (दौंड), यशवंत सहकारी – जाधववाडी (जुन्नर), श्री आदिशक्ति सहकारी- तांबे (जुन्नर), विठ्ठल रुक्मिणी सहकारी- वरसगांव (वेल्हा), हेमलता महिला – मांजरी बु (हवेली), कानिफनाथ सहकारी – दिसली (मुळशी), बलराम सहकारी – आणे (जुन्नर), अंदरमावळ विभाग सहकारी- वहानगांव (मावळ), काळदरी सहकारी – काळदरी (पुरंदर), श्री दत्तकृपा सहकारी – दामगुडेवाडी (भोर) या 16 संस्थांचा समावेश आहे. पशुखाद्यांची सर्वाधिक विक्री करणार्‍या 3 संस्थांमध्ये लक्ष्मीमाता वाळकी सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित वाळकी (दौंड), याकेश्वर पेठ सहकारी – पेठ (आंबेगांव), अंबिका सहकारी दूध – भांबर्डे (शिरुर) यांचा समावेश आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT