पुणे

तळेगाव स्टेशन : मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणा-यांवर कारवाई

अमृता चौगुले

तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्तसेवा : गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर तळेगाव दाभाडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी (दि. २३) कारवाई करत सुमारे ८७ लाख ८९ हजार ५२० रुपये किमतीचा मद्यसाठा तसेच मद्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला ट्रक एकूण  १ कोटी ५ लाख ७ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव विभागाच्या पथका मार्फत तळेगाव दाभाडे शहराच्या हददीत, जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील हॉटेल शांताई समोर रोडवर सापळा लावून गोवा राज्यनिर्मीत व केवळ गोवा राज्यात विक्रीस असलेले विदेशी मद्याचा साठा घेऊन जाणाऱ्या भारत बेंझ कंपनीचा ट्रक जप्त करुन कारवाई करण्यात आली. या ट्रकची (क्र.एम एच ४६ एएफ – ६१३८) तपासणी केली असता त्यामध्ये रिअल व्हिस्की ७५० मि.ली च्या ४ हजार १६४ सीलबंद बाटल्या व रिअल व्हिस्की १८० मि.ली च्या ५ हजार ७६० सीलबंद बाटल्या, रॉयल ब्ल्यू व्हिस्की ७५० मि.ली च्या ९ हजार ६०० सीलबंद बाटल्या असे विदेशी मद्याचे एकूण १ हजार २६७ बॉक्स दिसून आले.

या कारवाईत ८७ लाख ८९ हजार ५२० रुपये किमतीचा मद्य साठा व बेकायदेशीरपणे मद्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनसह १ कोटी ५ लाख ७ हजार ५२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये वाहन चालक प्रवीण परमेश्वर पवार (वय २४ वर्षे, रा.मु.पो. तांबोळे ता. मोहोळ जि. सोलापूर), देविदास विकास भोसले (वय-२९ वर्षे रा. मु.पो खवणी ता.मोहोळ जि.सोलापूर) यांना अटक करुन त्यांच्या विरुध्द गुन्हा नोंद केला आहे.

ही कारवाई , राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक प्रविण शेलार, दुय्यम निरीक्षक. दिपक सुपे, दुय्यम निरीक्षक प्रशांत दळवी, संजय राणे, योगेंद्र लोळे, महेश लेंडे, स्वाती भरणे, सहा. दुय्यम निरीक्षक सागर धुर्वे, रवि लोखंडे व जवान भागवत राठोड, राहुल जौंजाळ, रसुल काद्री, तात्या शिंदे, दत्ता पिलावरे, शिवाजी गळवे आदींनी केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक दिपक सुपे हे करीत आहेत.

SCROLL FOR NEXT