पुणे

पिंपरी : अनधिकृत होर्डिंगवर कारवाई सुरूच

अमृता चौगुले

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या पथकाकडून शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचा धडका कायम आहे. बुधवारी (दि.26) एकूण 9 होर्डिंग जमीनदोस्त करण्यात आले. त्यातील 5 होर्डिंग जाहिरात एजन्सीने स्वत:हून काढून घेतले. तर, 4 होर्डिंग पालिकेने पाडले.

किवळे येथे अनधिकृत होर्डिंग कोसळून 5 जणांचा बळी गेला. या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासन कारवाई मोहिम हाती घेतली आहे. ती अद्याप सुरू आहे. कारवाईत बुधवारी चर्‍होली, चिखली, देहू-मोशी रस्ता, लक्ष्मी चौक व ताथवडे येथील होर्डिंग हटविण्यात आले. ते होर्डिंग लुंकड बिल्डर, काळजे, आंगण, मरलीन, सफल ग्रुप, मनोहर बोराटे यांचे आहेत. आतापर्यंत पालिकेने एकूण 72 होर्डिंग जमीनदोस्त केले आहेत.

SCROLL FOR NEXT