पुणे

पुणे : महिलेला हायवा डंपरने चिरडले

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महात्मा फुलै चौकात हायवा डंपरने रस्ता ओलांडणार्‍या ज्येष्ठ नागरिक महिलेस चिरडले. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. लिला देवप्पा कांबळे (65, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत संतोष देवप्पा कांबळे (43, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी ईश्वर दत्तात्रय होळंबे (43, रा. मु. पो. हेळंब, ता. परळी, जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 11 जुलै रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास हा अपघात घडला.

SCROLL FOR NEXT