पुणे

भूमकर चौकातील चेंबरमुळे अपघाताचा धोका

अमृता चौगुले

वाकड : भूमकर चौकातून हिंजवडीकडे जाणार्‍या रोडवर रस्त्याच्या मधोमधच महापालिकेने चेंबर बनवले असून, चेंबरच्या बाजूने दगड ठेवले आहे. त्यामुळे अपघाताचा धोका व्यक्त केला जात आहे. या दगडाच्या कंपाउंडमुळे बर्‍याच वेळा वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर चेंबरची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे. सकाळच्या वेळेला दुचाकी घसरून अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

SCROLL FOR NEXT