ओतूर, पुढारी वृत्तसेवा : नगर-कल्याण महामार्गावरील पिंपळगाव जोगा गावच्या हद्दीत ट्रॅव्हल्स बस व ब्रिझा कारचा भीषण अपघात झाला. ही घटना आज रविवारी (दि. ४) सकाळी घडली. अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
नगर-कल्याण महामार्गावर पिंपळगाव फाटा नजिक कल्याणच्या दिशेने येणारी ब्रिझा कार (क्र. एमएच ४३ सीजी २९१३) व नगरच्या दिशेने जाणारी खासगी बस (क्र. एमएच ४७ बीएल ४२५१) यांची धडक झाली. या अपघातात रिया गायकर व कुसुम शिंगोटे या दोन महिला जागीच ठार झाल्या आहेत. मृत महिला नगर जिल्ह्यातील कळंब येथील रहिवासी आहेत. जखमींना उपचारासाठी आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे हे पुढील तपास करत आहेत.