पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : उघड्या दरवाजाला धडक बसल्याने झालेल्या अपघातात तीन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. आकुर्डी गावठाण चौकाजवळ रविवारी (दि. 21) हा अपघात झाला. शिवेंद्र आदेश विचारे (वय 3) असे मयत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी मुलाचे वडील आदेश विष्णू विचारे (42, रा. निगडी, प्राधिकरण) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन वेगवेगळ्या मोटारचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दुचाकीवरून मुलांना घेऊन खंडोबा माळ येथील खंडोबाच्या दर्शनाला जात होते. त्या वेळी आरोपी चालवत असलेल्या मोटारीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. फिर्यादी यांची दुचाकी आरोपी चालवत असलेल्या मोटारीच्या उघड्या दरवाजाला धडकली, त्यामुळे फिर्यादी मुलांसह रस्त्यावर पडले. त्या वेळी समोरून वेगात येणार्या दुसर्या मोटारीचे चाक शिवेंद्र याच्या अंगावरून गेले. यामध्ये शिवेंद्रचा जागीच मृत्यू झाला. या वेळी दोन्ही वाहनचालक तेथे न थांबता तेथून पळून गेले. निगडी आरोपींचा शोध
घेत आहेत.