वाल्हे : पुढारी वृत्तसेवा : पुणे – पंढरपूर पालखी महामार्गावरील वाल्हे (ता.पुरंदर) येथून वीर, हरणी, मांडकी, पिंगोरी, कवडेवाडी, आडाचीवाडी, परिंचे तसेच वाल्हे आदी गावांना जोडणा-या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साठल्याने अपघात होत आहेत. वाल्हे गावातील शहीद शंकर शिंदे चौकाजवळील ओढ्यावरील पुलाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू करण्यात आले आहे. पर्यायी मार्ग म्हणून ओढ्यामध्ये पाइप टाकून त्यावर तात्पुरत्या स्वरूपात रस्ता तयार करण्यात आला आहे.
मात्र, या रस्त्यावरून अवजड वाहतूक होत असल्याने ठिकठिकाणी रस्ता खचून, खड्डेमय झाला आहे. तसेच शहीद शंकर शिंदे चौकाजवळील खड्ड्यात पावसाचे पाणी साठल्याने वाहनचालकांना वाहन चालविणे कठीण झाले आहे. दरम्यान, शुक्रवार (दि.28) या मार्गावरून मांडकी येथील शेतकर्यांचे टोमॅटो भरून पिकअप टेम्पो जात असतानाच या रस्त्यांत त्याचा अॅक्सल तुटल्याने टेम्पो अडकून पडला. सदर रस्त्यावर मुरूम भरून तात्पुरती दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
हेही वाचा :