पुणे

महिलेला शिवीगाळ करून मारहाण ; अ‍ॅट्रॉसिटीसह अन्य गुन्हे दाखल

अमृता चौगुले

भिगवण : पुढारी वृत्तसेवा :  अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन वडिलांना सीलिंगमध्ये मिळालेली एक एकर जमीन परस्पर लाटल्याचा जाब विचारणार्‍या पारधी समाजाच्या महिला व तिच्या आईला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याने भिगवण पोलिसांनी म्हसोबावाडी येथील दोघांविरुद्ध फसवणूक व अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. नवनाथ दत्तात्रय पवार व दत्तात्रय पवार (दोघे रा. म्हसोबचीवाडी, ता. इंदापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. रितीरिवाजप्रमाणे शेतात पुरलेल्या नातेवाइकांच्या थडग्यांची पूजा करण्यास गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे पीडित महिलेने म्हटले आहे.

आई मनोरुग्ण, भाऊ व्यसनाधीन व वडील अडाणी असून, वडिलांनी 2011 मध्ये पवार यांना जमीन कसण्यासाठी दिली होती. तसेच 35 हजार देऊन जमीन गहाण ठेवली होती. पैसे परत दिल्यानंतर जमीन परत करण्याचे ठरले होते. दरम्यान रितीरिवाजप्रमाणे आम्ही थडग्यांची पूजा करण्यास गेलो असता, ही थडगी पवार यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाजूला काढल्याचे दिसले. यावरून आई व आपण याचा जाब त्यांना विचारला असता, दोघांनी मला व आईला ढकलून देत गलिच्छ शब्दात जातिवाचक शिवीगाळ केली व दमदाटी केली, तसेच गावात राहू न देण्याची धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे. आपल्या पूर्वजांना ही जमीन निरगुडे येथे गट नंबर 548 मध्ये सीलिंगमध्ये मिळाली होती; मात्र पवार यांनी गैरफायदा घेऊन जमीन लाटल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावरून भिगवण पोलिसांत अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT