शहरातील अल्पवयीन मुली, तरुणी, महिलांवरील अत्याराच्या घटना सातत्याने होत असतानाच आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका शाळेच्या शौचालयात मुलावरच लैंगिक अत्याचार घडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलाशी अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी शाळकरी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अत्याचार करणारा मुलगा हा साडेसतरा वर्षांचा आहे. याबाबत मुलाने लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित मुलगा शाळेच्या आवारातील शौचालयात गेला होता. शाळकरी मुलाने त्याला धमकावून त्याला विवस्त्र होण्यास भाग पाडले. त्याच्याबरोबर अनैसर्गिक कृत्य केले. मे महिन्यापासून मुलगा त्याच्यावर अत्याचार करत होता.
दरम्यान,नुकताच मुलाच्या शाळेत गुडटच बॅडटच (चांगला, वाईट स्पर्श)च्या अनुषंगाने उपक्रम घेण्यात आला होता. तेथे तज्ज्ञांनी मुलांना मार्गदर्शन करताना याबाबत आपल्या काही तक्रारी असल्यास न भीता भेटण्यास सांगितले होते. एवढे दिवस पीडित मुलगा भीतीखाली वावरत होता. मुलाने शाळेतील उपक्रमामुळे त्याच्यावर होण्यार्या घृणास्पद प्रकाराला वाचा फोडण्याची हिम्मत दाखवली. त्यांनी झालेला सर्व प्रकार शाळेतील शिक्षकांना सांगितला. त्यानंतर शाळा प्रशासनाच्या पुढाकारानेच मुलाने त्यांच्यावर झालेलया अत्याचारा विरूध्द त्याच्याच शाळेतील मुलाविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण (पोक्सो), तसेच अनैसर्गिक कृत्य तक्रार दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकार्यांनी शाळेला भेट दिली.
शहरातील एका महाविद्यालयात अल्पवयीन मुलीवर, तसेच वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका व्हॅनचालकाने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर बोपदेव घाटात तरुणीवर सामुहिक बलात्काराची घडना ताजी असतानाच शाळेतील या घृणास्पद प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे शहरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.