पुणे

गर्भलिंग निदान करून पुण्यातील निरा येथे गर्भपात

अमृता चौगुले

जेजुरी (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा :  पुरंदर तालक्यातील निरा येथील श्रीराम हॉस्पिटलमध्ये एका महिलेचे गर्भलिंग निदान करून गर्भात मुलगी असल्याने या महिलेचा गर्भपात केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात जेजुरी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. सचिन रामचंद्र रणवरे (रा. निरा, ता. पुरंदर) एजंट बरकडे व महिला दीपाली थोपटे (रा. पिसुर्टी, ता. पुरंदर), यांच्यावर जेजुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. निरा येथील श्रीराम हॉस्पिटलमध्ये एका महिलेचे गर्भलिंग निदान करण्यात आले आहे.

गर्भात मुलगी असून, या महिलेचा गर्भपात करणार असल्याची माहिती पुणे जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ एम्पल्ले यांना मिळाली. डॉ. एम्पल्ले व त्यांच्या सहकार्‍यांनी रविवारी (दि.14) सकाळी साडेआठच्या सुमारास निरा येथील श्रीराम हॉस्पिटलवर छापा घातला. दीपाली थोपटे यांना दुसरी मुलगी होणार असल्याचे गर्भलिंग चाचणीत निदान झाले व हॉस्पिटलमध्ये गर्भपात केल्याचे दिसून आले. अखेर डॉ. एमपल्ले यांनी तिघांविरोधात जेजुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर तपास करीत आहेत.

SCROLL FOR NEXT