पुणे

वेळू येथील पेट्रोल पंपावर दरोडा; चार जण गंभीर जखमी

अमृता चौगुले

खेड शिवापूर (ता. भोर); पुढारी वृत्तसेवा : पुणे-सातारा महामागार्वरील वेळू गावच्या हद्दीत असणार्‍या तुषार जगताप यांच्या श्रीराम पेट्रोल पंपावर गुरुवारी (दि. 22) रात्री साडेअकराच्या दरम्यान पाच जणांनी सशस्त्र दरोडा टाकून 21,800 रुपये लुटले. तसेच तीन कामगारांसह एका सुरक्षारक्षकाला कोयत्याने मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.

राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पाच जण दोन दुचाकीवरून पेट्रोल पंपावर आले. त्यांनी सुरक्षारक्षक भरत परिहार यांच्या हाताला पकडून पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये आणले. त्यानंतर तेथील कॅश द्या, असे ओरडत शिवीगाळ केली. त्यांनी 21,800 रुपये रक्कम लुटत कोयत्याने सुरक्षारक्षक व इतर तीन कामगारांना गंभीर जखमी केले.

त्यानंतर त्यांनी पुण्याच्या दिशेने पलायन केले. या घटनेच्या तपासासाठी पोलिस निरीक्षक सचिन पाटील, सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे व संजय सुतनासे यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके रवाना झाली आहेत. पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जोशी तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT