पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : घरासमोरील अंगणात कपडे धूत असलेल्या अल्पवयीन मुलीचा शेजारी राहणार्या तरुणाने विनयभंग करून मारहाण केल्याची घटना गुरुवारी (दि. 3) घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी आपल्या आईसह दारात कपडे धूत होती. त्या वेळी शेजारी राहणार्या आरोपीने तिचा विनयभंग केला.
या वेळी मुलीने विरोध केल्यामुळे आरोपीने फिर्यादी व तिच्या आईस मारहाण केली. त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या मोठ्या बहिणीस पोटात लाथ मारून तिघींना घरात कोंडून घराची कडी बाहेरून लावून निघून गेला. याविरोधात फिर्यादीने निगडी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.