बारामती: चार तरुणांच्या असह्य त्रासामुळे बारामती तालुक्यातील कोर्हाळे खुर्द येथील एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. मंगळवारी (दि. 8) ही घटना घडली. विशाल गावडे, प्रवीण गावडे, शुभम गावडे व सुनील खोमणे (सर्व रा. कोर्हाळे खुर्द, ता. बारामती) या आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला त्रास दिला गेला. तू माझ्याशी लग्न कर; अन्यथा तुझ्या घरातील लोकांची मुंडकी कोयत्याने उडवून टाकीन, अशी धमकी तिला देण्यात आली. या कारणावरून तिने राहत्या घरात लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. वडगाव निंबाळकर पोलिसांनी या चार तरुणांविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून सरंक्षण, आत्महत्येस प्रवृत्त करणे, शस्त्र अधिनियम, अॅट्रॉसिटी आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला.
मयत मुलीच्या वडिलांनी याप्रक?णी फिर्याद दाखल केली. मंगळवारी (दि. 8) पीडित मुलीने राहत्या घरामध्ये गळफास घेत आत्महत्या केली. मयत मुलीने सप्टेंबर 2024 मध्ये आई-वडिलांना गावातील विशाल गावडे हा मी शाळेत ये-जा करत असताना त्याच्या मित्रांसह मोटारसायकलवरून पाठलाग करतो.
त्याचे मित्र प्रवीण, शुभम व सुनील यांना तो ही माझी बायको आहे, असे म्हणून मला चिडवतो. तर त्याचे हे मित्र मला वहिनी म्हणून चिडवत असल्याची माहिती दिली होती. मुलीच्या आई-वडिलांना विशाल यास मुलीला त्रास देऊ नको, असे बजावले होते. त्यानंतरही तो तिला मोबाईलवर मेसेज करत होता.
28 फेब्रुवारी रोजी तिने इन्स्टाग्रामवरून विशालला मला कसले ही मेसेज करत जाऊ नको, असा मेसेज पाठवला. त्यावर त्याने शिवीगाळ केली होती. त्यातून ही मुलगी दडपणाखाली आली होती. 27 मार्चपासून ती सोमेश्वरनगरच्या एका अॅकॅडमीत कोर्ससाठी जात होती. 2 एप्रिल रोजी तिने घरच्यांना सांगितले की, मी सोमेश्वरला जात असताना विशाल हा पाठीमागून आला.
मी गावात एक वर्षापूर्वी कोयत्याने वार केले आहेत, तू जर माझ्याशी बोलली नाही, तर तुझ्या घरातील कोणालाही जिवंत ठेवणार नाही, सर्वांची कोयत्याने मुंडकी उडवीन, अशी धमकी दिली. तो गावामध्ये मोटारसायकलवर फिरत असताना त्याच्या मित्रासह फेर्या मारत होता. त्यामुळे ही मुलगी अधिकच घाबरली होती.
7 एप्रिल रोजी दुपारी तीनच्या सुमारास तिला विशालने लग्न कर; अन्यथा तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही, गावच्या यात्रेपूर्वी तुला लग्न करावे लागेल, अशी धमकी दिली होती. कुटुंबीयांनी या वेळी मुलीला समजावून सांगितले होते. मंगळवारी (दि. 8) मात्र तिने हा त्रास असह्य झाल्याने गळफास घेत आत्महत्या केली. उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड याप्रक?णी अधिक तपास करत आहेत.