विधानसभा निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत तसे प्रचाराचे वातावरण तापते आहे. प्रत्येक पक्ष आपल्या स्टार प्रचाराकांना प्रचाराच्या मैदानात उतवरत आहेत. भाजपानेही विधानसभेसाठी कंबर कसली आहे. पुण्याचा गड काबिज करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या वरिष्ठ नेत्यांची सभा पुण्यात पार पडणार आहे.
त्यापैकी 8 नोव्हेंबरला गृहमंत्री अमित शहा, 10 नोव्हेंबरला राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, 11 नोव्हेंबरला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तर सगळ्यात शेवटी 12 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात जाहीर सभा होणार आहे.
मागील लोकसभेसारखा फटका बसू नये म्हणून भाजप प्रचारात कोणतीही कसर बाकी ठेवताना दिसत नाही. त्यामुळे पुणे शहरासह 21 मतदार संघासाठी वरिष्ठ नेते पक्षातील नेते जाहीर सभा घेणार आहेत. सभेचे ठिकाण आणि वेळ निश्चित करण्यासाठी शहर भाजपाकडून तयारी सुरू झाली आहे.