पुणे

मंचर : तरुणाच्या दुचाकीला बिबट्याची धडक

अमृता चौगुले

मंचर(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : जवळे येथून दुचाकीने चाकण येथे कंपनीत कामावर जाणार्‍या तरुणाच्या दुचाकीला बिबट्याने अचानक समोरून येऊन धडक दिली. ही घटना गुरुवारी (दि. 16) पहाटे 4.30 च्या सुमारास निरगुडसर येथील वळसे मळा परिसरातील पुनर्वसन शेडजवळ घडली. यामध्ये बिबट्याची दुचाकीला पुढच्या चाकाला धडक बसल्याने तरुण दुचाकीसह रस्त्यावर पडल्याने जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत माहिती अशी की, जवळे येथील अभिजित महादेव शिंदे (वय 25) हा तरुण चाकण येथील महिंद्रा कंपनीत कामाला आहे. त्याची प्रथम पाळीत सेवा असल्याने तो गुरुवारी (दि. 16) पहाटे दुचाकीने कामाला जात होता. दरम्यान, पहाटे 4.30 च्या सुमारास निरगुडसर वळसे मळ्याजवळी पुनर्वसन शेडजवळ तो आला असताना एक बिबट्या अचानक त्याच्या दुचाकीच्या पुढील बाजूला धडकला. बिबट्या जोरात धडकल्याने शिंदे हा दुचाकीसह रस्त्यावर पडला. यात त्याच्या हात, डोके तसेच पायाला मार लागला आहे. या घटनेची माहिती कळताच जवळे गावचे पोलिस पाटील रवींद्र लोखंडे यांनी वन विभागाला याबाबत माहिती दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT