पुणे

राजगुरूनगर : वेताळे येथे विहिरीत आढळला बिबट्याचा बछडा

अमृता चौगुले

राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा : वेताळे (ता. खेड) येथील शिंदे शिवारात असलेल्या संदीप बोंबले यांच्या विहिरीत सोमवारी (दि. २४) बिबट्याचा बछडा आढळुन आला. विहिरीच्या कठड्यावर हा बछडा बसुन होता. अन्न, पाण्यासाठी भटकत असताना हा बछडा विहिरीत पडला असावा असे अंदाज आहेत. माहिती मिळाल्यावर या बछड्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. वृक्षारोपण व संवर्धन करणाऱ्या फोरटिन ट्रीज या संस्थेचे व्यवस्थापक अनंत तायडे, खेड रेस्कु टीमचे सागर कोहिनकर, अतुल गारगोटे, वनखात्याचे संदीप अरुण, अशोक बच्चे, राजाराम खंडवे, बजरंग बोरकर आदींनी बछड्याला बाहेर काढले.

SCROLL FOR NEXT