पुणे

पुणे : केडगाव येथे इलेक्ट्रिकल दुकानाला लागली आग

अमृता चौगुले

केडगाव : पुढारी वृत्तसेवा :  केडगाव येथील स्वामी समर्थ इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिक दुकानाला आग लागल्याने जवळपास 15 लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना शुक्रवारी (दि. 17) सायंकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान घडली. केडगाव बाजारपेठेमध्ये कुंभार कॉम्प्लेक्सशेजारी अंकुश प्रभाकर बारवकर यांचे पाच वर्षे जुने इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल्स दुकान आहे. बारवकर हे बाहेरगावी गेले असल्याने त्यांचे दुकान बंद होते.

या दुकानातून अचानक धूर निघू लागला. शेजारच्या नागरिकांना ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी ही आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात येईपर्यंत बंद दुकानातील टीव्ही, फॅन आणि इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल वस्तू जळून पूर्णपणे खाक झाल्या होत्या. आग मोठ्या प्रमाणात भडकल्यामुळे बंद असलेले शटरसुद्धा आगीच्या झोळांमध्ये तापून वाकडे झाले होते. याबाबतची माहिती दौंड तहसीलदार यांना देण्यात आली असून, जळीत प्रकरणाचा पंचनामा केला जाईल, अशी माहिती दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी दिली.

SCROLL FOR NEXT