पिंपरी : बालविवाहप्रकरणी पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार 13 ऑक्टोबर 2021 ते 27 सप्टेंबर 2022 या कालावधीत छत्तीसगड येथे घडला. याप्रकरणी महिलेने मंगळवारी (दि. 27) हिंजवडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मुलीच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला डॉक्टर आहे.
दरम्यान, एक गरोदर मुलगी त्यांच्या रुग्णालयात उपचारासाठी आली. मात्र, मुलगी अल्पवयीन असल्याचा संशय त्यांना आला. त्यामुळे त्यांनी चौकशी केली असता मुलीचे वय 17 वर्ष असल्याचे समोर आले. त्यामुळे फिर्यादी यांनी पोलिसांनी याबाबत माहिती दिली. त्यानुसार, हिंजवडी पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.