पूजा खेडकरच्या आई-वडिलांसह ५ जणांवर गुन्हा दाखल  file photo
पुणे

पूजा खेडकरच्या आई-वडिलांसह ५ जणांवर गुन्हा दाखल

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : जिल्हाधिकारी कार्यालयात रुबाब दाखविणाऱ्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांचे एक- एक कारनामे बाहेर येत आहेत. पूजाच्या आईने जमीन खरेदीच्या वादातून शेतकऱ्यांनाच चक्क पिस्तूल दाखविले असल्याचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पूजाची आई मनोरम खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांच्यासह इतर ५ जणांविरुद्ध पुणे ग्रामीण पोलिसाात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे.

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर सतत वादात सापडत आहेत. ओबीसी आरक्षणाचा गैरवापर करण्यापासून आयएएसची नोकरी मिळवण्यापर्यंत अनेक प्रकारचे आरोप त्यांच्यावर होत आहेत. आता पूजाचे आई-वडील देखील गोत्यात येत आहेत. मनोरमा खेडकर यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप करणाऱ्या शेतकऱ्याच्या तक्रारीच्या आधारे पौड पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्ह्या नोंद झाला आहे. आयपीसी कलम ३२३, ५०४, ५०६ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला असल्याचे पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना धमकावल्याचा जुना व्हिडीओ व्हायरल

कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे. त्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर त्यांच्या आई आणि सनदी अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या दिलीप खेडकर यांच्या पत्नी मुळशी तालुक्यातील घडवली गावात पासलकर आणि मरगळे कुटुंबीय वडिलोपार्जित भातशेती कसतात. काही महिन्यांपूर्वी पासलकर कुटुंबातील एकाला हाताशी धरून पूजा खेडकर यांच्या नावाने जमीन खरेदी करण्यात आली. त्यानंतर खेडकर कुटुंबाची अरेरावी सुरू झाली. जेवढी जमीन खरेदी करण्यात आली त्यापेक्षा जास्त जमिनीवर खेडकर कुटुंबाने दावा करायला सुरुवात केली. मात्र, शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला तेव्हा पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांनी चक्क पिस्तूल काढून या शेतकऱ्यांना धमकावत असल्याचे वास्तव समोर आले आहे. या शेतकऱ्यांनी जेव्हा पोलिसांकडे त्यांची तक्रार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी देखील दाद दिली नसल्याने मुळशी पॅटर्न'चा प्रत्यय या ठिकाणी पाहायला मिळाला.

शेळ्यांवर कुत्री सोडली

प्रामुख्याने जमीन सामाईक मालकीची असून, अजून या जमिनीच्या वाटण्या झालेल्या नाहीत, असा पासलकर कुटुंबीयांचा दावा आहे. मात्र, खेडकर कुटुंबाने मनमानी पद्धतीने त्या ठिकाणी जमिनीवर दावा करायला सुरुवात केली. त्याला विरोध करणाऱ्या मरगळे आणि पासलकर कुटुंबाचा जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा पेटवून देण्यात आला, तर कधी त्यांच्या शेळ्यांवर कुत्री सोडण्यात आली.

पोलिसांचे समजपत्र धडकले अन् खेडकरांच्या बंगल्यातून कार गायब

पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांचे नोटीसवजा समजपत्र मिळताच त्यांच्या बाणेरमधील बंगल्यातून आलिशान कार गायब करण्यात आली आहे. बाणेरमधील बंगल्यात वादातील कार झाकून ठेवण्यात आली होती. पुणे पोलिसांनी नोटीस बजावून वाहन चतुःशृंगी वाहतूक विभागात सादर करण्यास सांगितल्यानंतर शुक्रवारी (१२ जुलै) ही कार बंगल्यातून हलविण्यात आली आहे. याच कारवर अंबर दिवा लावून खेडकर या जिल्हाधिकारी कार्यालयात जात होत्या. त्याखेरीज बंगल्यात असलेली दुसरी कारही त्यांनी अन्यत्र हलवली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT