पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी 90 इच्छुक

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रियेत मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या व्यक्तींना येत्या आठ दिवसांत ई-मेलद्वारे माहिती देण्यात येणार आहे. त्यानंतर पडताळणीत पात्र ठरलेल्या व्यक्तींच्या मुलाखती सुरू होणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रक्रियेत 90 व्यक्तींकडून अर्ज दाखल करण्यात आले आहे, असे स्पष्ट करण्यात आले. विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू असून, या प्रक्रियेत अर्ज करण्याची प्रक्रिया 30 मार्च रोजी संपली आहे. पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलातील साधारण 16 प्राध्यापक हे कुलगुरू होण्यासाठी स्पर्धेत आहेत. अर्ज करणार्‍यांमध्ये कुलगुरू निवड समितीकडून या अर्जांची पडताळणी सध्या सुरू आहेत. अर्जांची संख्या अधिक असल्याने, पडताळणी करण्यास विलंब होत आहे. साधारणत: येत्या आठ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

त्यानंतर मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या व्यक्तींना ई-मेलद्वारे मुलाखतीसाठी बोलविण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर मुलाखतीद्वारे निवडलेली अंतिम काही नावे राज्यपाल कार्यालयाकडे पाठविण्यात येतील. यापैकी एक नाव कुलपती कार्यालयाकडून कुलगुरू म्हणून जाहीर करण्यात येणार आहे.

मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड लवकरच
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी नुकत्याच मुलाखती घेतल्या गेल्या आहेत. यामध्ये पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांची नावेही चर्चेत आहेत. त्याचप्रमाणे कुलगुरू निवड समितीच्या सदस्यांनीही सोमवारी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली असून, अंतिम पाच नावांची यादी बैस यांना सोपविली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड जाहीर होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT