पुणे; पुढारी वृत्तसेवा : सौरऊर्जेचा वापर दिवसेंदिवस वाढत असून घरगुती, शेती तसेच औद्योगिक वापरासाठी या विजेचा वापर होऊ लागला आहे. पुणे परिमंडलात आतापर्यंत सुमारे 9 हजार सौरऊर्जा प्रकल्प बसविले आहेत, तर साडेतीन हजार सौरऊर्जा प्रकल्प बसविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. सौरऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन मिळावे, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. पंतप्रधान कुसूम योजना, सोलर रूफ टॉप योजनेंतर्गत घरगुती स्तरावरील सौरऊर्जानिर्मितीसाठी केंद्र शासनाकडून वित्तसाह्य देण्यात येते.
यामध्ये घरगुती ग्राहकांसाठी 1 ते 3 किलोवॅटपर्यंत 40 टक्के आणि 3 किलोवॅटपेक्षा अधिक ते 10 किलोवॅटपर्यंत 20 टक्के सामूहिक वापरासाठी 500 किलोवॅटपर्यंत; परंतु प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना 20 टक्के असा समावेश आहे.
महावितरणने रूफ टॉप सौरऊर्जानिर्मिती यंत्रणा आस्थापित करण्यासाठी परिमंडलनिहाय एजन्सीची नियुक्ती केली आहे. त्याची यादी व ऑनलाइन अर्जांची सोय महावितरणच्या पाच वर्षांच्या देखभाल खर्चासह रूफ टॉप सौरऊर्जानिर्मिती यंत्रणेसाठी 1 किलोवॅट 46,820, 1 ते 2 किलोवॅट 42,470, 2 ते 3 किलोवॅट 41,380, 3 ते 10 किलोवॅट 40,290 तसेच 10 ते 100 किलोवॅटसाठी 37,020 रुपये प्रतिकिलोवॅट किंमत आहे. या दराप्रमाणे 3 किलोवॅट क्षमतेसाठी सौरऊर्जा यंत्रणेची 1 लाख 24 हजार 140 रुपये किंमत आहे. त्यामध्ये 40 टक्के अनुदानाप्रमाणे 49 हजार 656 रुपयांचे केंद्रीय वित्तसाह्य मिळेल व संबंधित ग्राहकास प्रत्यक्षात 74 हजार 484 रुपयांचा खर्च करावा लागेल.
रूफ टॉप सौरऊर्जानिर्मिती यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर दरमहा 100 युनिटपर्यंत वापर असलेल्या घरगुती ग्राहकांकडील एक किलोवॅट क्षमतेच्या सौरयंत्रणेमधून वीजबिलामध्ये सध्याच्या वीजदरानुसार दरमहा सुमारे 550 रुपयांची बचत होऊ शकेल. तसेच, या यंत्रणेला लावण्यात आलेल्या नेटमीटरिंगद्वारे वर्षअखेर शिल्लक वीज प्रतियुनिटप्रमाणे महावितरणकडून विकत घेतली जाईल.
त्याचाही आर्थिक फायदा संबंधित घरगुती ग्राहकांना होणार आहे. सोबतच सौरयंत्रणा उभारणीच्या खर्चाची साधारणतः 3 ते 5 वर्षांत परतफेड होणार आहे.
पुणे परिमंडल
घरगुती 6,482
वाणिज्यिक 1,206
औद्योगिक 564
इतर 632
एकूण 8,884
पुणे परिमंडल
घरगुती 2,556
वाणिज्यिक 362
औद्योगिक 223
इतर 74
एकूण 3,