‘वंदे भारत’  Pudhari File Photo
पुणे

पुणे-कोल्हापूर-हुबळी वंदे भारतमधून 8742 जणांचा प्रवास

पुढारी वृत्तसेवा

प्रसाद जगताप

पुणे-कोल्हापूर-हुबळी नुकत्याच सुरू झालेल्या वंदे भारत रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत म्हणजेच 20 दिवसांच्या कालावधीत या गाडीतून आठ हजार 742 प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्याद्वारे रेल्वे प्रशासनाला 90 लाख 17 हजार 063 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

पुणे- कोल्हापूर- हुबळी वंदेभारत रेल्वेचे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन झाले. पुणे रेल्वे स्थानकावर शानदार उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी पुणे रेल्वे स्थानकावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते. तेव्हापासून बुधवार (दि.2) पर्यंत या गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसत आहे.

प्रवासासाठी लागणारा वेळ

पुणे-हुबळी वंदे भारत : आठ तास 30 मिनिटे

पुणे-कोल्हापूर : पाच तास 25 मिनिटे

असे आहेत तिकीट दर

  • पुणे- कोल्हापूर वंदे भारत - चेअर कार

    880 रुपये

  • पुणे-कोल्हापूर वंदे भारत-एक्झिक्युटिव्ह क्लास

    1710 रुपये

  • पुणे-हुबळी वंदे भारत-चेअर कार

    1475 रुपये

  • पुणे- हुबळी वंदे भारत-एक्झिक्युटिव्ह क्लास

    2730 रुपये

पुणे-कोल्हापूर आणि पुणे-हुबळीदरम्यान धावणार्‍या वंदे भारत रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आगामी काळात या गाड्यांचा प्रतिसाद आणखी वाढणार आहे.
डॉ. मिलिंद हिरवे, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, पुणे विभाग

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT