76 टक्के बालके कुपोषणमुक्त; पुणे जिल्ह्याची कुपोषणमुक्तीकडे वाटचाल file photo
पुणे

76 टक्के बालके कुपोषणमुक्त; पुणे जिल्ह्याची कुपोषणमुक्तीकडे वाटचाल

अतितीव्र कुपोषित 67 बालकांपैकी 54 बालकांच्या प्रकृतीत सुधारणा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कुपोषणमुक्त पुणे जिल्हा मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात कुपोषित बालकांसाठी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आली होती. त्या केंद्रांत दाखल केलेल्या 544 कुपोषित बालकांना योग्य पोषण आणि आहार देण्यात आल्याने त्यापैकी 364 बालके अर्थात 76 टक्के बालके कुपोषणमुक्त झाली आहेत.

तसेच अतितीव्र कुपोषित 67 बालकांपैकी 54 बालकांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. कुपोषित बालकांना आहार, उपचार देण्यासाठी अंगणवाड्यांमध्ये ग्राम बालविकास केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.

गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये ही केंद्र सुरू करण्यात आली होती. त्या केंद्रांमध्ये जिल्ह्यांमधील 544 बालके दाखल करण्यात आली होती. जिल्ह्यात 452 इतकी बालविकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. त्यात अतितीव्र कुपोषित 67 तसेच मध्यम स्वरूपाची 477 अशी एकूण 544 कुपोषित बालके दाखल करण्यात आली होती.

या बालकांना 50 दिवस विकास केंद्रात ठेवण्यात आले होते. बालविकास केंद्रांमध्ये सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत आरोग्य अधिकारी तसेच अंगणवाडीसेविकांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले होते, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील 544 बालकांपैकी 76 टक्के बालके कुपोषणमुक्त झाली आहेत. उर्वरित बालकांना कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत सातत्यपूर्ण पद्धतीचे प्रयत्न करण्यात येणार आहेत.
- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT