पुणे

पिंपरी : शहरात आढळले 650 रक्तक्षयाचे रुग्ण ; महापालिकेची मिशन अक्षय-अ‍ॅनिमियामुक्त पीसीएमसी मोहीम

अमृता चौगुले

पिंपरी : शहरामध्ये महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या 'मिशन अक्षय-अ‍ॅनिमियामुक्त पीसीएमसी' मोहिमेत अ‍ॅनिमियामुक्त कॉर्नरच्या माध्यमातून 650 जणांना रक्तक्षय झाल्याचे आढळून आले आहे. त्यांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आवश्यक उपचार आणि प्रतिबंधात्मक वैद्यकीय सेवा देण्यात आली.

रक्तक्षय म्हणजे काय?
रक्तक्षय ही बालके, किशोरवयीन मुले-मुली, प्रजननक्षम स्त्रिया, व गर्भवती मातांमध्ये आढळणारी समस्या आहे. यामुळे शारीरीक वाढ योग्य रितीने न होणे, शारीरीक कार्यक्षमता कमी असणे, बालकांची शारीरीक व बौध्दिक वाढ कमी होणे, संसर्गजन्य रोगास बळी पडणे यासारखे दुष्परिणाम होतात. त्यासाठी बालके, किशोरवयीन मुले-मुली, प्रजननक्षम स्त्रिया, व गर्भवती माता यांच्यातील लोहाची कमतरता/रक्तक्षय ओळखून/तपासून त्यावर तातडीने उपचार करणे आवश्यक आहे.

शाळांमध्ये औषधांचे वाटप
केंद्र व राज्य शासनाच्या अ‍ॅनिमियामुक्त भारत मोहिमेच्या धर्तीवर महापालिका कार्यक्षेत्रामध्ये मिशन अक्षय-अ‍ॅनिमियामुक्त पीसीएमसी मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम अंगणवाडी, मनपा शाळा, मनपा दवाखाना व रुग्णालयामध्ये अ‍ॅनिमियामुक्त कॉर्नरचे माध्यमातून राबविण्यात आली. मोहिमेत अपेक्षित लाभार्थी गटास राज्य शासनामार्फत प्राप्त मार्गदर्शक सुचनानुसार प्रतिबंधात्मक लोहयुक्त औषध व गोळया देण्यात आल्या, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.

24 हजारांपेक्षा अधिक बालकांना सिरप
6 महिने ते 59 महिने वयोगटातील एकुण 24 हजार 651 बालकांना लोहयुक्त सिरप, महापालिका शाळांमधील 5 ते 10 वर्षे वयोगटामधील एकुण 30 हजार 482 विद्यार्थ्यांना लोहयुक्त गुलाबी गोळया देण्यात आल्या. 11 ते 19 वर्षे वयोगटामधील एकुण 31 हजार 156 विद्यार्थ्यांना लोहयुक्त निळया गोळया दरमहा एप्रिल 2022 पासून दिल्या आहेत. तसेच, वर्गशिक्षकांमार्फत प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी विद्यार्थ्यांना लोहयुक्त गोळी सेवन करण्यासाठी द्यावी यासाठी सर्व शाळांना सूचना दिल्या आहेत. तसेच, 20 ते 49 वर्षे प्रजननक्षम वयोगटातील 32 हजार 669 महिलांना व 4 हजार 369 गरोदर मातांना लाल गोळया सेवन करण्यासाठी दिलेल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT