पुणे : गणेशोत्सव काळात गणपती मंडळांचे देखावे पाहण्यासाठी मध्यवस्तीत मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यावेळी वाहतूक पोलिसांकडून मार्ग बंद करून वळविले जातात. त्याच कालावधीसाठी म्हणजेच 19 ते 28 सप्टेंबर 2023 या काळात पीएमपी प्रशासनाने पर्यायी मार्ग सुरू केले आहेत. पीएमपी प्रशासनाकडून गणेशोत्सव काळात गणेशभक्तांसाठी जादा 640 बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. रात्री 10 नंतर दैनंदिन बस गाड्यांचे बंद होऊन स्पेशल गाड्याच्या माध्यमातून पीएमपीची सेवा सुरू राहणार आहे.
…अशा धावतील बस
- शिवाजी रस्त्याने येण्यास प्रतिबंध केल्यानंतर जंगली महाराज रोड, बालगंधर्व, डेक्कन, संभाजी पूलमार्गे टिळक रोडने स्वारगेट चौकात येऊन पुढे नेहमीच्या मार्गाने बस जातील.
- टिळक रोड वाहतुकीस बंद झाल्यानंतर या मार्गाच्या बस शास्त्री रोडने दांडेकर पूल येथे येऊन पुढे मित्र मंडळ चौक मार्गे लक्ष्मी नारायण चौकात येऊन नेहमीच्या मार्गाने मार्गस्थ होतील.
- स्वारगेटहून शिवाजीनगरकडे जाताना बाजीराव रोडवरील वाहतुकीस प्रतिबंध होईपर्यंत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
- 'रस्ता बंद' काळात शनिपार/मंडईऐवजी नटराज स्थानकावरून बस सोडण्यात येतील. तसेच या बस जाता-येता नेहमीच्या मार्गाने म्हणजेच अंबिल ओढा कॉलनी, सेनादत्त पोलिस चौकी मार्गे सुरू राहतील.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.