पुणे

बारामती : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला सांगत केली ५६ लाखांची फसवणूक

अमृता चौगुले

बारामती; पुढारी वृत्तसेवा: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास ७० टक्के नफा मिळवून देतो, असे आश्वासन देत गुंतवणूकीला भाग पाडत बारामतीतील १८ जणांची फसवणूक केल्याप्रकरणी संजय भुसकुटे (रा. जय टाॅवर, चिंचवड) यांच्या विरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी येथील गारमेंट व्यावसायिक संजय मधुकर सातव (रा. तावरे बंगल्याजवळ, आमराई, बारामती) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी हे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असल्याने संजय भुसकुटे यांनी सातव यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. भुसकुटे यांनी त्यांच्या ट्रेड एडीएशन या इन्व्हेस्टमेंट फर्मबद्दल माहिती दिली.

ट्रेड इडिशन फर्मध्ये शेअर मार्केटसाठी गुंतवणूक केल्यास ८० टक्के नफा देण्याचे अमिष दाखवले. काही तोटा झाल्यास ट्रेड एडीशन फर्मचा संस्थापक या नात्याने सर्व जबाबदारी माझी राहिल असे सांगत विश्वास संपादन केला. मोतीलाल ओसवाल हे या कंपनीमध्ये सब ब्रोकर आहेत, तुमचे पैसे सुरक्षित राहतील असे सांगितले. त्यानुसार फिर्यादीने पाच लाखाची गुंतवणूक केली.

याशिवाय विजय भाऊसाहेब बनकर, सतिश बबन किर्दक, कैलास बाबुराव कदम, उत्तम नानासो जगदाळे, जयवंत राजेंद्र सातव, प्रशांत राजेंद्र चव्हाण, अमोल रामकृष्ण खटावकर, राहूल रामकृष्ण खटावकर, रामदास अंबादास कापसे, सचिन माणिक शितोडे, बाबुराव विठ्ठल चव्हाण, संजय लक्ष्मण थोरात, अनिता अविनाश कदम, स्नेहल संजय सातव, सुजाता बाळासाहेब सुरासे, राजेश रमेश तांबडे, राजेश कलाप्पा कवाडे या सर्वांनी प्रत्येकी ३ लाख रुपयांप्रमाणे ५१ लाख रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणूकीनंतर त्यांनी शेअर मार्केट खात्याचे आयडी व पासवर्ड भुसकुटे यांना दिले. ठरल्याप्रमाणे ७० टक्के नफा न देता त्यांनी गुंतवलेले पैसे परत न करता फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT