पुणे

उजनीतून भीमेत 51,600 क्युसेकने विसर्ग

अमृता चौगुले

बावडा : उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणार्‍या पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून, मंगळवारी (दि.11) सायंकाळी 6.30 वाजता तब्बल 51 हजार 600 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उजनी धरणामध्ये मंगळवारी सायंकाळी 6 वाजेचा पाणीसाठा हा 123.22 टीएमसी एवढा प्रचंड असून, धरण 111.17 टक्के क्षमतेने भरलेले आहे.

उजनीतून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग मंगळवारी सकाळी 10 वाजता 6 हजार 600 क्युसेकवरून 10 हजार क्युसेक करण्यात आला. वाढ करून तो सायंकाळी 6.30 वाजता तब्बल 50 हजार क्युसेक करण्यात आला. त्यामुळे सायंकाळी 6 वाजता उजनी धरणातून होणारा विसर्ग 51 हजार 600 क्युसेक एवढा झाला आहे.

SCROLL FOR NEXT